"प्रेम" म्हणजे सुख दुखात सारखीच साथ देणारं बंधन आहे. प्रत्येक नात्यात होतात तसे काही रुसवे फुगवे या नात्यात आले, तर ते आपणच सोडवले पाहिजेत. आयुष्यात आयुष्यभरासाठी प्रेम करणारी निस्वार्थी माणसं कमी असतात. त्यात खऱ्या प्रेमालाही एक महत्वपूर्ण जागा आहे . आपण जिच्यावर किंवा ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या मनात खूप खोलवर रुतलेली असते तिच्या भेटीसाठी जीव व्याकुळ होतो. अबोला धरलेला असेल तर जगणं कठीण होतं, हेच प्रेम असतं. थोडासा मतभेद झाला म्हणून नातं तोडू नये. आपण जरी चुकलो नसू तरी आपल्या प्रेमासाठी आपण थोडं समजून घेऊन माफी मागितली तर आपण काही लहान ठरणार नसतो . ती व्यक्ती जिला आपल्या अबोल्यानेही त्रास होतच असणार . आपण कधीतरी अशी चुक करून बसू शकतो , आपल्या मीपणाच्या भावनेमुळे की आपल्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी व्यक्ती खूप दुरावली जाऊ शकते. नितांत प्रेम असेल आणि मनातील भाव शुद्ध असतील तर तेव्हा होणारा त्रास हा आपल्याला या जगापासून खूप कुठेतरी दूर नेऊन ठेवतो विचारांच्या विश्वात.त्यामुळे जगणं कठीण होऊन जातं आणि ते कुठेतरी सांगण्या...