श्री स्वामी समर्थ

                              श्री स्वामी समर्थ 

        माझ्या वाचक आणि स्वामी भक्तांना माझा सहृदय प्रणाम. आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव त्या परमेश्वराला असते.   तरीही आपण आपल्या व्यथा सारख्या त्यांच्यापाशी मांडत असतो जसं लहान मूल आपल्या आई वडिलांना आपलं दुखलं खुपलं तर वारंवार सांगत असतं अगदी तसंच. कारण भक्त आणि भगवंत यांचं नातं माय लेकरसारखंच असतं. आपण जी काही गोष्ट करू ती त्यांचा  स्मरनाने करायची . यश आलं तर त्या यशात त्या भगवंताचे आभार मानायचे अपयश आणि अडथळे आले तर त्यांच्याच कृपेवर विश्वास ठेऊन जिद्देने सामोरे जायचे. आयुष्य हा एक खेळ आहे तो प्रत्येकजण आपआपल्या परीने खेळत असतो .  पण या खेळात आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवायचा . नक्कीच हरण्याची भीती मनातून केव्हाच नाहीशी झालेली असेल.



टिप्पण्या