पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राम कृष्ण हरी

इमेज

श्री गुरुदेव दत्त

इमेज
आयुष्यात एवढं काही नको आहे की जे मागता मागता संपूर्ण आयुष्य निघून जाईल. सुख दुःखाचा प्रसंग तर ऊन वाऱ्यासारखा झेलायचाच असतो . नुसतं ऊन पडलं नेहमी तरी चालणार नाही किंवा नुसता पाऊस पडला तरी तो योग्य नाही. आयुष्यात सुख दुःखाचा समतोल असला तरच जगण्यात आनंद वाटतो.  तरी तुमच्या कृपेवर श्रद्धा ठेवून जगणारे प्रत्येक गोष्टीला तोंड देणारे तुमचे भक्त आजही आहेत. आयुष्याशी जुळवून घेत परिस्तिथी जुळवून घेत जगणं आहे कारण भक्तांची परीक्षा जरी घेत असलास तरी त्यातून बाहेर काढणारा पण तूच आहेस. याची जाणीव प्रत्येकाला आहे आणि असलीच पाहिजे. म्हणून कितीही घाव झेलावे लागले तरी प्रत्येकवेळी तुलाच आळवणार, तुझेच नाम स्मरण करणार. हे गुरुराया तुमचे आशीर्वाद नेहमीच भक्तांच्या पाठीशी असताना मनात जगण्याची भीती उरत नाही.                           ✍️विशाल विकास मराठे                               कणकवली - दिगवळे

श्री गणेशाय नमः

इमेज

राम कृष्ण हरी

इमेज

सोड अतिरेक पावसा

इमेज

जय शिवराय जय शंभू राजे

इमेज

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

इमेज
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !! आयुष्यात लहान मोठ्या सर्व व्यक्तींकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. काही व्यक्तीकडून त्यांच्या अनुभवातून काही शिकून आपण आपल्या आयुष्यात मार्ग निवडत असतो त्यांनाही गुरु स्थानी मानलं पाहिजे. शाळेत शिकवणारे गुरुजन त्यांचा आदर हा आयुष्यभर केलाच पाहिजे कारण काही वयापर्यंत आपल्याला गुरूचा महिमा हा कळत नसतो पण जीवन जगताना तो क्षणाक्षणाला आठवतो.  आपल्या चुका सुधारण्यासाठी त्यांचा धाकच महत्वाचा होता याची जाणीव होत असते आणि जर असे शिक्षक आपल्या आयुष्यात नसते तर आपण एक चांगली व्यक्ती म्हणून समाजात फिरलो नसतो. आपल्याला चांगल्या विचारांची भेट गुरुच देत  असतात मग ते गुरू शिक्षक , आई वडील, मित्र मैत्रिणी, किंवा आयुष्यात येणारी कोणतीही व्यक्ती असुदेत एखाद्यगोष्टीच ज्ञान आपण ज्या व्यक्तीकडून घेतो ती आपली गुरू समजावी. एखादी गोष्ट आपल्याकडून उत्तम व्हावी यासाठी सतत प्रेरणा देणाऱ्या आणि एखादी गोष्ट  आपण ज्यांना हक्काने विचारतो त्या सर्व आदरणीय व्यक्ती ह्या गुरुसमान आहेत.           माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टीतून मला शिकायला...

श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

इमेज
!!श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ!!           आयुष्याच्या परिक्षेचा पेपर प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. म्हणून तो आपला आपणच सोडवायचा असतो. कितीही कठीण वाटलं तरी उत्तर हे द्यावच लागतं.   "आधी हाताला चटके मग मिळते भाकर" हे जेवढं खरं आहे तसेच आयुष्यात यातना सोसल्याशिवाय येणाऱ्या सुखाची चव गोड वाटणार नाही.  परीक्षा घेणारा जो आहे त्यालाच मार्गदर्शक म्हणून वेळोवेळी जपलं तर आयुष्याच्या परीक्षेत नापास तरी  होणार नाही. कोण किती साथ देईल याची गॅरंटी नाही. वेळ आपल्या बाजूने आज आहे तर उद्या नाही. आपल्या स्पष्टपणामुळे जरी आपल्याला वाईट ठरवलं गेलं तरी आपल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवणारा परमेश्वर आहे. आपण चांगले की वाईट याची जाण आपल्याला आणि इश्वराला असली तरी पुरे आहे. आपण अपल्यामधल्या चांगल्या गोष्टी सोडायच्या नाहीत. कोण सोबत असुदेत किंवा नसुदेत पण विश्वास ठेवला तर देव आपली साथ कधीच सोडत नाही.         !! राम कृष्ण हरी!!                       धन्यवाद !!   ...

श्री स्वामी समर्थ

इमेज
 

राम कृष्ण हरी

इमेज
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!         कोरोनाच्या प्रसारामुळे आज पंढरीची वारी जरी बंद असली तरी वारकऱ्यांच्या मनातील पालखी, वारी, दिंडी कधीच पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारात जाऊन पोहचली असेल काही सांगता येत नाही. आज याच वारकरी , आणि प्रत्येक पांडुरंगाच्या भक्तांच्या मनातले भाव व्यक्त करण्याचा एक प्रयत्न या कवितेतून केलाय . कारण लाखो भाविक मग ते बाल, वृद्ध, तरुण-तरुणी या आषाढी एकादशीची वाट पाहत असतात आणि आजच्या या परिस्तितून त्यांना जरी जाता आलं नाही तरी त्यांचं  पांडुरंगावरच प्रेम कमी होणार नाही. कारण देवाशी जुळलेले नाते घट्ट असेल तर कुठूनही हात जोडले तरी त्याच्यापर्यंत तो नमस्कार पोहचलाच जातो. आज जरी इच्छा असली पांडुरंग भेटीची तरी आपल्याला कोरोनासारख्या कालियुगातल्या या  दैत्याला समूळ नष्ट करायचं आहे याचं भान प्रत्येक वारकरी भक्तांना आहे . जरी पंढरपुरात पोहचले नाही तरी पांडुरंगाचे चरण सोडणार नाहीत. जिथे टेकू माथा ते चरण पांडुरंगाचे , करु वंदन ज्यांना ते रूप विठ्ठलाचे. चांगल्या वाईट प्रसंगी पांडुरंगाचे स्मरण प्रत्येक दिवशी घरोघरी होतं. कारण फक्त सण आणि ब...

राम कृष्ण हरी

इमेज

राम कृष्ण हरी

इमेज

बेधुंद पाऊस आणि प्रेमाच्या ओल्याचिंब शब्दसरी

इमेज
       कोसळणारा पाऊस बेधुंद असावा पण नुकसान करणारा नसावा. कारण त्या पावसाचे प्रत्येकाच्या मनात घर असतं म्हणून तरी त्या पावसाने कोणाच्या घरात शिरायचं नसतं. पावसाचे गोडवे लिहिले जातात, गाणी म्हटली जातात कारण लोकं पावसावर भरपूर प्रेम करतात. अगदी आपल्या हक्काच्या व्यक्तींवर जसं प्रेम असतं तसंच प्रेम या पावसावर प्रत्येक माणसाचं असतं. म्हणून प्रेमाला पावसाची उपमा देणं चुकीचं ठरत नाही. आणि प्रेम म्हटलं की त्याला शब्दांची मर्यादा उरत नाही शब्दात सांगता येत नाही. पावसाळ्यात दिसणारं इंद्रधनुष्य सप्तरंगांच जरी असलं तरी त्या सप्तरंगांकडून आठवण होते ती प्रेमरंगाची. माणूस हा आठवणी जपत असतो . कारण आयुष्यात काही व्यक्ती असणं हेच फार भाग्यचं  वाटू लागतं मग दूर असतानासुद्धा  पावसातील बेभान वाऱ्यासारखं आपलं मन वाट पाहत असतं ती त्यांच्या भेटीची. मनात जरी दुःख असलं तरी पावसात भिजताना डोळ्यातले पाणी त्या पावसात कधी मिसळून जातं समजत नाही . पण प्रेमाची ताकद एवढं बळ देऊन जाते की लाख गोष्टी आपल्या विरुद्ध आपल्याला हरवण्यासाठी जरी असल्या मग ती परिस्थिती असो किंवा कोणी व्यक्ती सगळ्याल...

श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

इमेज

राम कृष्ण हरी

इमेज

राम कृष्ण हरी

इमेज

राम कृष्ण हरी

इमेज

वेड

इमेज
       "वेड" 😊😊              आपल्या एखाद्या गोष्टीवर आपल्याला वेड्यात काढणारे शहाणे मिळतात. काही साधारण शहाणे असतात काही उंटावरचे शहाणे असतात. चूक असली आणि जर कोणी काही सांगत असेल तर नक्कीच त्याचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे . पण स्वतःचा शहाणपणा मिरवण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखणारे कमी आहेत काय?? अशा लोकांसाठी आपण वेडे असलो तरी काय रागवण्याचं, वाईट वाटण्याचं कारण नाही . दुनिया ही नाव ठेवण्यासाठीच आहे. जे नावं तर देवाला सुद्धा ठेवतात मग आपण कुठून सुटणार. पण खरंच त्रास दुनियेचा नाही होत त्यांच्या नावं ठेवण्याचा नाही होत कारण आपण काय दुनियेच्या भरवशावर जगत नाही . जगतो ते आपल्या माणसासाठी , आपली माणसं , आपल्या हक्काची  माणसं , कुठल्याही एवढ्याशा कारणानेही आपल्या माणसांना या दुनियेच्या वाईट प्रवृत्तीचा सामना करावा लागू नये , त्यांना दुनिया नको ती नावं ठेऊ नये, कुठल्या संकटात आपली माणसं अडकू नये हीच इच्छा असते. वाईट गोष्टींपासून दूर राहावी , वाईट सवयी सोडाव्यात याचसाठी आपण सांगत असतो. समजवत असतो. पण तरीही वेड्यात जेव्हा आपले आपल्याल...

श्री स्वामी समर्थ

इमेज
श्री स्वामी समर्थ!          आयुष्यात खूप उतार चडाव असतात. कधीकधी आयुष्य गुंतागुंतीचं वाटू लागतं. काय करायचं चांगलं काय वाईट काय आपण वागतोय ते योग्य की अयोग्य काही कळायला मार्ग नसतो. आपली साथ कोण देतंय कोण देईल काही माहीत नसतं पण स्वामींवर असलेल्या श्रद्धेमुळे आयुष्याचा प्रत्येक गुंतलेला धागा अलगद सुटला जातो आपण फक्त आपलं कार्य करत राहायचं आपल्या आयुष्याच्या रथाचा सारथी होऊन स्वामी आपल्याला पुढे नेतील आणि स्वामी सोबत असताना , आपली त्यांच्यावर श्रद्धा असताना भयास जागा उरत नाही . कारण "अशक्य ते शक्य करतील स्वामी " हे खरंच आहे. खूप लोकांचे अनुभव आज प्रत्येकाकडे आहेत. श्रद्धा आणि आपले प्रयत्न यांची जोड असली की कार्य सफल होतं आणि जरी काही राहीलच तर अजून प्रयत्न करून पुढे जाण्याची प्रेरणा पण हीच श्रद्धा आपल्याला देत असते. आजच्या या धावत्या युगात प्रत्येकाला जसा वेळ मिळेल तसा नामस्मरण करतात कोणी फेसबुक youtube , इतर social media मधून आपापल्या परीने नाम जप करत असतो. नाम घेण्याला कुठलं बंधन नाही की विशिष्ट वेळ नाही आणि नाम घेणाऱ्या प्रत्येकाच्या संसाराची नौका किनाऱ्याला ल...

राम कृष्ण हरी

इमेज

श्री गणेशाय नमः

इमेज

राम कृष्ण हरी

इमेज

राम कृष्ण हरी

इमेज

राम कृष्ण हरी

इमेज

राम कृष्ण हरी

इमेज