श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

!!श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ!!
          आयुष्याच्या परिक्षेचा पेपर प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. म्हणून तो आपला आपणच सोडवायचा असतो. कितीही कठीण वाटलं तरी उत्तर हे द्यावच लागतं.   "आधी हाताला चटके मग मिळते भाकर" हे जेवढं खरं आहे तसेच आयुष्यात यातना सोसल्याशिवाय येणाऱ्या सुखाची चव गोड वाटणार नाही.  परीक्षा घेणारा जो आहे त्यालाच मार्गदर्शक म्हणून वेळोवेळी जपलं तर आयुष्याच्या परीक्षेत नापास तरी  होणार नाही. कोण किती साथ देईल याची गॅरंटी नाही. वेळ आपल्या बाजूने आज आहे तर उद्या नाही. आपल्या स्पष्टपणामुळे जरी आपल्याला वाईट ठरवलं गेलं तरी आपल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवणारा परमेश्वर आहे. आपण चांगले की वाईट याची जाण आपल्याला आणि इश्वराला असली तरी पुरे आहे. आपण अपल्यामधल्या चांगल्या गोष्टी सोडायच्या नाहीत. कोण सोबत असुदेत किंवा नसुदेत पण विश्वास ठेवला तर देव आपली साथ कधीच सोडत नाही. 
       !! राम कृष्ण हरी!! 
                     धन्यवाद !!    
                            ✍️ विशाल विकास मराठे . 
                                (कणकवली - दिगवळे)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा