गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

आयुष्यात लहान मोठ्या सर्व व्यक्तींकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. काही व्यक्तीकडून त्यांच्या अनुभवातून काही शिकून आपण आपल्या आयुष्यात मार्ग निवडत असतो त्यांनाही गुरु स्थानी मानलं पाहिजे. शाळेत शिकवणारे गुरुजन त्यांचा आदर हा आयुष्यभर केलाच पाहिजे कारण काही वयापर्यंत आपल्याला गुरूचा महिमा हा कळत नसतो पण जीवन जगताना तो क्षणाक्षणाला आठवतो.  आपल्या चुका सुधारण्यासाठी त्यांचा धाकच महत्वाचा होता याची जाणीव होत असते आणि जर असे शिक्षक आपल्या आयुष्यात नसते तर आपण एक चांगली व्यक्ती म्हणून समाजात फिरलो नसतो. आपल्याला चांगल्या विचारांची भेट गुरुच देत  असतात मग ते गुरू शिक्षक , आई वडील, मित्र मैत्रिणी, किंवा आयुष्यात येणारी कोणतीही व्यक्ती असुदेत एखाद्यगोष्टीच ज्ञान आपण ज्या व्यक्तीकडून घेतो ती आपली गुरू समजावी. एखादी गोष्ट आपल्याकडून उत्तम व्हावी यासाठी सतत प्रेरणा देणाऱ्या आणि एखादी गोष्ट  आपण ज्यांना हक्काने विचारतो त्या सर्व आदरणीय व्यक्ती ह्या गुरुसमान आहेत.
          माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टीतून मला शिकायला मिळालं ते माझे गुरू. शाळा, कॉलेजमध्ये पण अभ्यासा व्यतिरिक्त जीवनमूल्यांचे दिलेले धडे न विसरण्या सारखे आहेत, त्या गुरुजनांचे लाख लाख आभार. कला क्षेत्रातही अनमोल शिक्षण देणारे गुरू असतात त्याच क्षेत्रातील इतर व्यक्तीसुद्धा कधीकधी कुठल्याही स्वार्थाशिवाय खूप मार्गदर्शन करतात त्या सर्वांची जागा मी गुरुस्थानी मानतो .  मित्र परिवारात काही मित्र जणू ज्ञानाचा, महितीचा साठा असतात  ते आपल्यासाठी त्यांचा बहुमूल्य वेळ देत असतात. कारण ज्ञान दिल्याने ते कमी होत नसतं तर वाढत जातं उजळणी होते स्वताचाही साराव होतो याची जाणीव ठेवून आपणही आपल्याकडील ज्ञान दुसऱ्याच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी वापरल पाहिजे. अशा कित्येक व्यक्ती , पुस्तकं आपले गुरू असतात पण अजून एक गुरू असतो तो म्हणजे अनुभव. अनुभवाने शहाणपण येतं हेच खरं. तस बघायला तर या दुनियेलासुद्धा गुरू म्हटली तरी चूकिचं ठरणार नाही. कारण  आयुष्य जगताना दुनिया खूप काही शिकवून जाते.

टिप्पण्या