वेड

       "वेड" 😊😊
             आपल्या एखाद्या गोष्टीवर आपल्याला वेड्यात काढणारे शहाणे मिळतात. काही साधारण शहाणे असतात काही उंटावरचे शहाणे असतात. चूक असली आणि जर कोणी काही सांगत असेल तर नक्कीच त्याचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे . पण स्वतःचा शहाणपणा मिरवण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखणारे कमी आहेत काय?? अशा लोकांसाठी आपण वेडे असलो तरी काय रागवण्याचं, वाईट वाटण्याचं कारण नाही . दुनिया ही नाव ठेवण्यासाठीच आहे. जे नावं तर देवाला सुद्धा ठेवतात मग आपण कुठून सुटणार. पण खरंच त्रास दुनियेचा नाही होत त्यांच्या नावं ठेवण्याचा नाही होत कारण आपण काय दुनियेच्या भरवशावर जगत नाही . जगतो ते आपल्या माणसासाठी , आपली माणसं , आपल्या हक्काची  माणसं , कुठल्याही एवढ्याशा कारणानेही आपल्या माणसांना या दुनियेच्या वाईट प्रवृत्तीचा सामना करावा लागू नये , त्यांना दुनिया नको ती नावं ठेऊ नये, कुठल्या संकटात आपली माणसं अडकू नये हीच इच्छा असते. वाईट गोष्टींपासून दूर राहावी , वाईट सवयी सोडाव्यात याचसाठी आपण सांगत असतो. समजवत असतो. पण तरीही वेड्यात जेव्हा आपले आपल्यालाच काढत असतात तेव्हा खूप वाईट वाटतं. पण नाही लक्ष द्यायला कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अनुभव हाच श्रेष्ठ गुरू असतो. काही आपली माणसं तर आपल्या बोलण्याला तर मनोरुग्ण ,  वेड लागलं , मानसिक आजार अशी नावं ठेऊन मोकळी होतात. होऊदेत काहीच प्रश्न नाही. वेडा वेडा म्हणून हीनवून अपमान करून शेवटी लोकांना जाग येते आपण कुठेतरी चुकलो याची तोपर्यंत वाट पहायची. कारण हे हिनवनं संताना देखील चुकलं नाही अशा जगात जगतो आपण याचं आपल्यालाही भान असलं पाहिजे . आपण तर एक साधारण मनुष्य आहोत. वेड अनेक गोष्टींचं असतं एखादी गोष्ट आपल्याला जास्त आवडत असते तेव्हा पण त्या गोष्टीचं आपल्याला वेड आहे म्हणून अडवलं जातं . जर गोष्ट चांगली असेल तर आपण का सोडायची ज्या गोष्टीत आपल्याला आवड आहे ती गोष्ट नक्कीच करत राहायची . दुनिया ज्यांना वेडे, मतिमंद समजायची त्यांनी आपली कीर्ती आपल्या कार्याने गाजवून ठेवली याची उदाहरणे याच दुनियेत खूप मिळतील. आपण कार्य करत राहायचं जरी कीर्ती नाही झाली तरी आपल्याला ते येतं, जमतं याच गोष्टीचं समाधान घेऊन तरी जगू शकतो. एक वेड तर प्रेमाचं पण म्हटलं जातं. ज्यात प्रत्येक गोष्टीला प्रेम जबाबदार ठरवलं जातं. आणि प्रेमाला दूषणं देणारे तेच असतात ज्यांना प्रेम म्हणजे काय हेच कळलेलं नसतं. एकमेकांची काळजी प्रेम आहे. एकमेकांचा आधार प्रेम आहे. प्रेमात दुनियेला महत्व दिलं तर प्रेम टिकताना कठीण होऊन जाईल. पण जर खर प्रेम असेल तर आयुष्य संपलं तरी संपणार नाही माणूस मिटेल प्रेम नाही.  प्रेम म्हणजे एकत्र जगलं एकत्र राहिलं म्हणून टिकेल असं नसतं . माणूस कितीही दूर असला तरी त्याची येणारी आठवण त्याची वाटणारी काळजी हेच प्रेम आहे आणि खऱ्या प्रेमचं सर्वोत्तम उदाहरण  म्हणजे राधा कृष्ण. कुठे आहे राधा कुठे आहे कृष्ण कोणी पाहिले जरी नाही, तरीपण आजही युगायुगापासून राहिलं ते त्यांचं प्रेम आपण जाणवू शकतो मुरलीच्या सुरात आणि पुस्तकांच्या पानांत.
!! राधा कृष्ण हरी!!

टिप्पण्या