श्री गुरुदेव दत्त

आयुष्यात एवढं काही नको आहे की जे मागता मागता संपूर्ण आयुष्य निघून जाईल. सुख दुःखाचा प्रसंग तर ऊन वाऱ्यासारखा झेलायचाच असतो . नुसतं ऊन पडलं नेहमी तरी चालणार नाही किंवा नुसता पाऊस पडला तरी तो योग्य नाही. आयुष्यात सुख दुःखाचा समतोल असला तरच जगण्यात आनंद वाटतो.  तरी तुमच्या कृपेवर श्रद्धा ठेवून जगणारे प्रत्येक गोष्टीला तोंड देणारे तुमचे भक्त आजही आहेत. आयुष्याशी जुळवून घेत परिस्तिथी जुळवून घेत जगणं आहे कारण भक्तांची परीक्षा जरी घेत असलास तरी त्यातून बाहेर काढणारा पण तूच आहेस. याची जाणीव प्रत्येकाला आहे आणि असलीच पाहिजे. म्हणून कितीही घाव झेलावे लागले तरी प्रत्येकवेळी तुलाच आळवणार, तुझेच नाम स्मरण करणार. हे गुरुराया तुमचे आशीर्वाद नेहमीच भक्तांच्या पाठीशी असताना मनात जगण्याची भीती उरत नाही.
                          ✍️विशाल विकास मराठे
                              कणकवली - दिगवळे

टिप्पण्या