श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ!
आयुष्यात खूप उतार चडाव असतात. कधीकधी आयुष्य गुंतागुंतीचं वाटू लागतं. काय करायचं चांगलं काय वाईट काय आपण वागतोय ते योग्य की अयोग्य काही कळायला मार्ग नसतो. आपली साथ कोण देतंय कोण देईल काही माहीत नसतं पण स्वामींवर असलेल्या श्रद्धेमुळे आयुष्याचा प्रत्येक गुंतलेला धागा अलगद सुटला जातो आपण फक्त आपलं कार्य करत राहायचं आपल्या आयुष्याच्या रथाचा सारथी होऊन स्वामी आपल्याला पुढे नेतील आणि स्वामी सोबत असताना , आपली त्यांच्यावर श्रद्धा असताना भयास जागा उरत नाही . कारण "अशक्य ते शक्य करतील स्वामी " हे खरंच आहे. खूप लोकांचे अनुभव आज प्रत्येकाकडे आहेत. श्रद्धा आणि आपले प्रयत्न यांची जोड असली की कार्य सफल होतं आणि जरी काही राहीलच तर अजून प्रयत्न करून पुढे जाण्याची प्रेरणा पण हीच श्रद्धा आपल्याला देत असते. आजच्या या धावत्या युगात प्रत्येकाला जसा वेळ मिळेल तसा नामस्मरण करतात कोणी फेसबुक youtube , इतर social media मधून आपापल्या परीने नाम जप करत असतो. नाम घेण्याला कुठलं बंधन नाही की विशिष्ट वेळ नाही आणि नाम घेणाऱ्या प्रत्येकाच्या संसाराची नौका किनाऱ्याला लावण्याची ताकद श्री स्वामी समर्थांकडे आहे याची प्रत्येक स्वामी भक्ताला खात्री आहे. देव आणि भक्त यांच्यातील नातं हे आई मुलासारखं असावं . स्वामी माय माऊली आहेत ते आपल्या चरणांकडे असलेल्या भक्ताला उचलून कडेवर घेतील. फक्त जी काही वेडीवाकडी सेवा आपल्या कडून होईल ती करत राहावी. मग ती सेवा समाजासाठी झाली, प्राणी - पक्षांसाठी झाली तरी नाम घेत करावी स्वामींपर्यंत ती सेवा पोहचतच असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा