आई

      आईबद्दल लिहायला शब्द कमी पडतील. "आई" या विषयावर अगणित साहित्य वाचायला मिळतं . खरचं आई सारखे दैवत या दुनियेत कोणी नाही हे म्हटलेलं आहे ते खरं. पण सर्वानाच आई बद्दलच्या भावना तिला सांगता येत असतील काय? आणि जरी काही नाही सांगत म्हणजे त्यांच्या मनात आईबद्दल प्रेम नाही काय? शब्दांची जागा जेव्हा भावना घेतात त्यावेळी त्या योग्य वेळी त्या कृतीतून दिसून येतात, आज आई-आई करणारे उद्या म्हातारपणात त्या माउलीला विसरणारे खूप आहेत म्हणजे काय लहानपणी तो आईप्रेमाचा दिखावा होता काय तर नाही . त्यांचंही ते आईवरचं प्रेम असतं पण काळानुसार त्यात एवढा फरक का हे ज्याचे त्यालाच ठाऊक .  जे कधीही आईबद्दलचे प्रेम  व्यक्त करत नाहीत त्यांच्याही मनात आईसाठी नक्कीच मंदिर बांधलेलं असतं . त्यांच्या मनातील भाव माझ्या "आई " कवितेतून व्यक्त करतोय
🙏

टिप्पण्या