श्री स्वामी समर्थ
माय माऊली स्वामी आई तुझ्या चरणांशी सदैव माझे मस्तक राहो. आलेल्या प्रत्येक संकटाला तुझ्यावरच्या विश्वासावर तोंड देण्याचे बळ माझ्यासारख्या प्रत्येक स्वामीभक्तांस मिळो. तुला प्रसन्न करण्यासाठी जरी मी तुझे उपासतपास करत नसलो तुझ्या चरणांशी पुष्प वाहत जरी नसलो तरी स्वामी आई तुझ्या चरणांशी माझं हृदयपुष्प आणि माझे हे शिरकमल प्रत्येक जन्मात भक्तीभावाने असेल. तू नेहमीच माझ्या पाठीशी आहेस याची जाण मला वेळोवेळी जाणवते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा