अजिंक्य योद्धा
जय शिवराय! जय शंभू महाराज.
महाराष्ट्राच्या या पवित्र मातीमध्ये वीर शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. भारताच्या इतिहासातील अजिंक्य योद्धा म्हणून ज्यांचे नाव अमर झाले असे आपले संभाजी महाराज . त्यांच्या पवित्र चरणांशी नथमस्तक होणं या शिवाय दुसरं भाग्य नाही. अनेक लढाया केल्या एकही लढाई हरले नाही. स्वराज्याचे स्वप्न वडिलांचे राजे विसरले नाहीत. आपल्याच माणसांमुळे राजे कैद झाले विविध प्रकारेचे सहन केले .कोणत्याही आमिषाला भुलले नाही की स्वतःच्या जिवाच्या रक्षणासाठी मागे हटले नाहीत . स्वराज्याच्या रयतेसाठी , हिंदू धर्मासाठी आपला देह अर्पिला. म्हणूनच आज प्रत्येकाच्या काळजात संभाजी महाराज जिवंत आहे. एक साधी सुई अंगाला टोचली तर आपल्याला वेदना होतात मग सोसल्या असतील तापलेल्या सळया त्यांनी आपल्या डोळ्यांमध्ये . अंगावर होणाऱ्या प्रत्येक घावाला कसे उत्तर दिले असेल . विचारांच्याही पलीकडे हे सत्य आहे . नक्कीच प्रत्येकाच्या मनात महाराजांचा आदर आणि सन्मान भरलेला आहे. माझी महाराजांच्या पायाची धूळ होण्याचीही पात्रता नाही. तरीही या वीराला माझा कवितेतून मुजरा करण्याचा प्रयत्न करतोय.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा