महाराष्ट्राची हास्य जत्रा
आपल्या आयुष्यात आपण खूप हसतो कारण हसवणारे आपल्या आयुष्यात असतात . हसणं हे आरोग्यासाठी खूप आवश्यक असतं. आपले त्रास दुःख हे सारं या हसण्यामुळे कुठेतरी कमी होत असतं. असंच निरंतर हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. एक एक विनोदवीर स्त्री- पुरुष जणू जन्मास येतानाच हे इतरांना हसवण्याचं बळ घेऊन आला असेल एवढे प्रतिभावंत आहेत. स्वतःचे दुःख विसरूनही दुसऱ्याला नेहमी सारखंच हसवायचं काम करणाऱ्या माझ्या आवडत्या कलाकारांना त्यांचा आदर म्हणून काही चार शब्द सुचले ते या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. कारण ज्या ज्या वेळी मन अस्वस्थ वाटलं त्या त्या वेळी या कार्यक्रमाची साथ मिळाली. कधी एकटा पडलो नाही एवढं मनोरंजन मिळालं ते youtube वर वारंवार प्रत्येक भाग आवडीने पाहिल्यावर. माझ्यासारख्या बऱ्याच जणांना हा कार्यक्रम नक्की आवडत असेल आणि त्यांचेही त्या सर्व टीम बद्दल हेच भाव असतील .खरोखर टेंशनवरची मात्रा , महाराष्ट्राची हास्य जत्रा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा