किमया वृक्षवल्लीची

आपल्या सर्व सजीवांचे जीवन निसर्गातील पंचमहाभूतांवर अवलंबून असतं. त्यात हवा हा एक महत्वपूर्ण घटक आहे . त्याला श्वास म्हणून आपण शरीरात घेतो . आपल्याला भरभरून हे ऑक्सिजन देणारे ते वृक्ष असतात पण आपण बंगले, इमारती, घरे बांधण्यात गढून गेलोकी किती वृक्षतोड केली याची जाणीव नाही आपल्याला. आपल्या सुविधांसाठी निसर्गावर घाव घातलेले आपण आपल्याला अजूनही या वृक्षांचे महत्व कळत नाही . वृक्षतोडीच्या तुलनेत  वृक्षारोपण खूपच कमी आहे. आपण जरा विचार केला ह्या झाडांशिवाय आपलं आयुष्य कसं असेल तर आपल्याला नक्कीच त्याचे महत्व कळेल . माझ्या  " किमया वृक्षवल्लीची "  या कवितेतून मी ते व्यक्त करण्याचा एक प्रयत्न करतोय. 
           धन्यवाद!!



टिप्पण्या