श्री गुरुदेव दत्त! आमचं कोकण निसर्गाने नटलेलं आणि लोककला, सण, आणि माया ममतेने भरलेलं. याच कोकणाचा सर्वांचा आवडता विषय म्हणजे कोकण दशावतार. आंबा, काजु, फणस, शिमगा , गणेश उत्सव म्हटल्यावर आठवतो तो कोकण त्या कोकणाची अजून एक ओळख म्हणजे दशावतार. या दशावतारामुळे एक एक रत्न अभिनयाने, आवाजाने, गाण्याने, नृत्याने कोकणच्या मातीवर दहिकले, जत्रा यांच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात आहेत . त्यांच्या अभिनयाला तोड नाही साक्षात हजारो वर्षे मागे घडलेल्या गोष्टी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो की काय असा भास रसिकांच्या नजरेस निर्माण करणारे हे कलाकार. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपमुळे असे कार्यक्रम खूप कमी पाहायला मिळतात पण तुमचे रसिक तुम्हाला हृदयात ठेवतात आणि ते तुम्हाला विसरणार नाहीत याची जाण म्हणून एक काव्य लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. आपण अशीच कला वर्षोनुवर्षे पुढे अखंड चालू ठेवावी ही इच्छा त्या विघ्हर्त्या जवळ मनोभावे व्यक्त करतो. मायबाप सरकार आपल्यासाठी काही सोयी सुविधा उपलब्ध करून आपण जपत असलेल्या कलेसाठी म्हणून योग्य असे मानधन देऊन आपला गौरव असाच पुढे निरंतर चालू राहण्यास...