राम कृष्ण हरी आपल्या एखाद्या व्यक्तीवर कायम स्वरूपी राग ठेऊन काय मिळणार आहे . माझं तुझं करून तरी काय कमवणार असतो आपण. सारं मिळवण्यात आयुष्य जातं पण माणूस मेल्यावर स्वतःच शरीरसुद्धा सोबत नेऊ शकत नाही मग संपत्ती कसा नेईल. तरी लालसा असते ती संपत्ती सोबत ठेवण्याची. मग ती आप आपसात वाद करून का होईना मिळवायची अशा समजात जगत असतो. कष्ट करून मिळवलेल्या संपत्तीचा अभिमान हवाच पण मनुष्याला एक कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी सारं कमावतो तर त्यांच्यातच गर्व करुन दाखवणं चुकीचं आहे. जन्मास आल्यानंतर आपल्याला जपणारे, सांभाळणारे मार्ग दाखवणारे खूप असतात आणि मेल्यावर सुद्धा स्मशान भूमीपर्यंत पोहचवणारे पण इतर लोक असतात मग फुकटचा मी पणा कशाला करायचा. त्या मी पणातून निर्माण होतात ते क्लेश. घरात कलह असतील तर तिथे सुख संपदा नांदनार तरी आहे काय? जन्माला आलो ते जगून माणसं कमवून हसत आयुष्य जगायचं सोडून आपण भांडणात गुंतून फक्त स्वार्थाचा विचार करत असतो . पण स्वार्थाने कमावलेल्या गोष्टीत कोणाला सुख मिळालेलं नाही आणि मिळणारही नाही. आपलीच माणसं आपल्यापासून दूर होत...